वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात सध्या वाहतुकीच्या नियमाबाबत काही नियम लागू केले आहेत. परंतु काही नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. यामुळे अनेक दुर्घटना घडल्याची बाबसुद्धा समोर आली आहे. मात्र आता वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला चक्क 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या एका बैठकीत मोटार वहान विधेयकाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्यास लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्याचसोबत महत्वाच्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग न दिल्यास चालकांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. यापूर्वी मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली होती. तरीसुद्धा रस्ते अपघात कमी झाल्याचे दिसून आले नाही. मात्र आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारची सत्ता आल्याने वाहतुक नियम-कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नियम मोडणाऱ्यांवर अंकुश घालण्यासाठी हजारोंमध्ये दंडाची वसूली करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.('या' चुकीच्या कारणांमुळे काही मिनिटांत तुम्हाला गाडीच्या दंडाची पावती हातात देण्यात येईल)

दंडाची वसूली अशा पद्धतीने असेल:

-इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास 20 हजार रुपयांचा दंड

-हेल्मेट न घातल्यास 10 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येणार

-अल्पवयीन मुल वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालक आणि पालकांना दोषी ठरवणार. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार

>अल्पवयीन मुल वाहन चालवताना पकडला गेल्यास तीन वर्षांचा तुरुंगवासासह 25 हजार रुपयांचा दंड

>वाहतुकीचे नियम मोडल्यास 500 रुपयांचा दंड

>संबंधित प्रशासनाचे न ऐकल्यास 2 हजार रुपयांचा दंड

>वेगात गाडी चालवल्यास 2 हजार रुपयापर्यंत दंड

त्याचसोबत वाहन परवान्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कॅब चालकांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच ओव्हरलोडिंगसाठी 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.