'या' चुकीच्या कारणांमुळे काही मिनिटांत तुम्हाला गाडीच्या दंडाची पावती हातात देण्यात येईल
'या' चुकीच्या कारणांमुळे काही मिनिटांत तुम्हाला गाडीची पावती हातात देण्यात येईल (Photo Credits-Facebook)

सध्या राज्यात वाहतूकीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. तसेच वाहतूकीचे नियम न पाळल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. तसेच डिजीटल पद्धतीने तुम्हाला गाडीवरील दंडाची रक्कम मोबाईलवर उपलब्ध होते. अशा स्थित जर तुम्ही 'या' चुकीच्या कारणांमुळे गाडी चालवल्यास तुमच्या हातात गाडीची पावती फाडून तुमच्या हातात देण्यात येईल. त्यामुळे वाहतूकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते.

गाडी पार्किंग करण्यापूर्वी सावधान रहा

जर तुम्हाला असे वाटत असेल की, पार्किंग स्टँडशिवाय तुम्ही गाडी उभी करु शकता. तर हे अत्यंत चुकीचे आणि नियमाविरुद्ध आहे. तुम्ही तुमची गाडी शाळा, रुग्णालय किंवा सरकारी भवनाच्या बाजूला पार्किंगच्या भागात उभी करु शकतात. असे नाही केल्यास तुम्हाला वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरावा लागेल. त्याचसोबत बस स्टॉप, वाहतूक सिग्नल, जेब्रा क्रॉसिंग किंवा मुख्य रस्त्यावर तुम्ही गाडी पार्किंग करु शकत नाही.

दारु पिऊन गाडी चालवणे

दारु पिऊन गाडी चालवणे हे अत्यंत चुकीचे असून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे दुर्घटना होण्याची फार शक्यता असते. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्यास तरही त्याचे प्रमाण अतिउच्च नसले पाहिजे. नाहीतर दारु पिऊन गाडी चालवत असाल तर वाहतूक पोलिसांकडून तुमच्यावर कारवाई केली जाईल.

चुकीच्या रस्त्याने गाडी चालवणे

काही लोक चुकीच्या रस्त्याने गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच एक मार्गाने सुरु असेलल्या वाहतूकीच्या रस्त्याने कधीन गाडी चालवू नका. त्याचसोबत एक तर्फी महार्गावर चुकुनही गाडी पुढे घेऊन जाण्याचा विचार करु नका.

सीट बेल्ट

बाईकसाठी चालकाने हेल्मेट घालणे अत्यावश्यक असते. त्याचसोबत गाडीसाठी सीट बेल्ट लावणे जरुरीचे आहे. जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो.

स्पीड लिमिट

काही ठिकाणांवर गाडीसाठी स्पीड किती असावा हे ठरवून दिलेले असते. तसेच गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांवर, हायवेवर दुर्घटना होऊ नये म्हणून स्पीड लिमिट किती ठेवण्यात यावी याची सूचना फलकांवर लिहिलेली असते. जर तुमच्या गाडीचा स्पीड लिमिट अधिक असल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने काळजीपूर्वक वाहन चालवावे याबाबत सुचना देण्यात येते. तसेच वरील गोष्टी लक्षात ठेवून गाडीने संभाळून प्रवास करा.