सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट; आजपासून 'या' वस्तू होणार स्वस्त
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

नववर्षाच्या सुरुवातील सरकारने सर्वसामान्यांसाठी खास गिफ्ट दिले आहे. बहुतांश वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आले आहेत. हे दर 28% वरुन 18% करण्यात आले असल्याने आजपासून अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.  33 वस्तूंवरील GST मध्ये कपात, नवीन दर 1 जानेवारी 2019 पासून लागू- अर्थमंत्री अरुण जेटली

मोबाईल पॉवर बँक, व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडिओ गेम कन्सोल्स, डिजिटल कॅमेरा, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, क्रीडा साहित्य या वस्तूंवरील जीएसटी 28% वरुन 18% करण्यात आला आहे.

हवाबंद गोठवलेल्या भाज्यांवरील 5% जीएसटी रद्द करण्यात आला आहे. अपंगांच्या व्हिलचेअर त्याच्याशी निगडीत सर्व वस्तू जीएसटी 28% वरुन 5% करण्यात आला आहे. त्याचबरोबर नववर्षात सिनेमा पाहणेही स्वस्त होणार आहे. 100 रुपयांवरील सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी 28% वरुन 18% करण्यात आला आहे. तर 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवरील जीएसटी 18% वरुन 12% करण्यात आला आहे.