युक्रेन-रशिया संघर्षामध्ये सध्या जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या संघर्षाचे परिणाम आता शेअर बाजार आणि सोन्यावरही पहायला मिळत आहे. आज नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतामध्ये सोन्याचे दर 10 ग्राम सोन्यासाठी कालच्या तुलनेत वाढून 24 कॅरेट सोन्यासाठी ₹51,280 आणि 22 ग्रॅम सोन्यासाठी ₹47,000 रूपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ₹65,200 इतका झाला आहे. कालच्या तुलनेत आज चांदी 1100 रूपयांनी वधारली आहे. सध्या लगीन सराई देखील सुरू असल्याने सोन्याच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
सोन्याचा वापर महागाईविरूद्ध बचाव म्हणून आणि आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात संपत्ती जतन करण्याचे साधन म्हणून केला जातो. त्यामुळे युक्रेन-रशियाच्या युद्धाच्या प्पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीला पुन्हा झळाळी आली आहे. दरम्यान रशियन मध्यवर्ती बँकेने देखील देशांतर्गत मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत पुन्हा सोन्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
#Gold and #Silver Opening #Rates for 28/02/2022#IBJA pic.twitter.com/iC1C9c8FPv
— IBJA (@IBJA1919) February 28, 2022
भारतामध्ये आजपासून Sovereign Gold Bond Scheme 2021-22 - Series X देखील सुरू झाली आहे. 4 मार्च पर्यंत सुरू राहणार्या या गोल्ड बॉन्ड्स मध्ये ग्राहकांना सरकारच्या वतीने आरबीआय प्रतिग्राम ₹ 5,109 इतक्या किंमतीमध्ये सोनं उपलब्ध करून देत आहे. यामध्ये किमान 1 ग्राम सोन्यामध्ये गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध असतो.