Gold Silver Rate Today: कोरोना संकटकाळात जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली होती. मात्र आज (27 जानेवारी) भारतामध्ये सोन्याचे भाव 49 हजारांच्या खाली गेले आहे. ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचा भाव कमी होणं हे खरेदी करणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दरम्यान प्रत्येक शहरानुसार आणि सोन्याच्या कॅरेट नुसार दर कमी- जास्त नोंदवण्यात आला आहे. पण मुंबई मध्ये मात्र आज कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 330 रूपयांनी दर कमी झाल्याचं पहायला मिळालं आहे.
Good Returnsच्या माहितीनुसार आज मुंबई मध्ये सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्यासाठी 49,000 रूपये आहे तर चैन्नई मध्ये 50610 रूपये, दिल्लीमध्ये 52250 रूपये आणि कोलकता मध्ये 51190 रूपये इतका आहे. दरम्यान सोनं खरेदीमध्ये 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं. मात्र त्यामध्ये दागिने क्वचितच बनवले जातात. दागिन्यांसाठी 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याची निवड केली जाते. त्याचे दर जसे कॅरेट कमी तसे कमी कमी आकारले जातात. नक्की वाचा: Stock Market: इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 पार, निफ्टी 14,700 अंकाच्याही पुढे.
सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरांमध्येही भारतात 300 रूपयांची घट नोंदवण्यात आली आहे. आज चांदीचा प्रति किलो दर हा 66,200 रूपये इतका आहे. काल हाच दर 66500 प्रति किलो होता. आज मुंबईतील चांदीचा दर 66,200, चैन्नई मध्ये 70800, दिल्ली आणि कोलकत्ता मध्ये प्रत्येकी 66200 रूपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर देखील उअतरत आहे. मागील 30 दिवसांमध्ये हे दर 1.74% कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या ते USD 32.60 च्या बरोबरीला आले आहेत.
दरम्यान ही सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पहायला मिळणार आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत.