Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

आज धनोत्रयादशी (Dhanteras) म्हणजेचं हिंदु संस्कृतीनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस. आजच्या दिवशी कुठल्याही नव्या कामाची सुरुवात करायची असल्यास किंवा नव्या वस्तुची खरेदी करायची असल्यास आजचा दिवस सर्वोत्तम. आजच्या दिवशी सोने चांदिची खरेदी (Gold Silver Purchase) करणं सर्वाधिक शुभ समजल्या जातं. तरी तुम्ही आज सोनं चांदी खरेदी करायचा विचार करत असल्यास आजचा दिवस लाभदायक ठरेल. दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोनं चांदीच्या बाजारपेठेत मोठी गर्दी बघायला मिळाली. पण आज म्हणजेचं धनोत्रयादशीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीपेक्षा सोने चांदिच्या भावात (Gold Silver Price Rate) मोठी घसरण बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात सोने चांदिच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली असली तरी आज धनोत्रयादशीच्या मुहूर्तावर जाणून घ्या तुमच्या शहरात सोने चांदीचा भाव काय. आज सोन्या चांदिची खरेदी कितपत फायद्याची.

 

आज देशभरात सोन्याचे भाव देशभरात वधरले असुन सोने चांदिच्या खरेदीसाठी आज सर्वोत्तम दिवस म्हणता येईल. कारण गेल्या काही दिवसातील सोने चांदिचे दर (Gold Silver Price Rate) बघता आज सोनं अगदी किफायती दरात उपलब्ध आहे.  सोन्याच्या नव्या फ्युचर्स दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रामचा दर 51,280 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा (Silver) दर 57,700 रुपये आहे. (हे ही वाचा:- 7th Pay Commission: दिवाळीपूर्वी वाढणार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, 'या' राज्यांनी केली घोषणा; महाराष्ट्र आहे का त्यात? घ्या जाणून)

 

आज मुंबईतील (Mumbai) सोन्याचे (Gold) दर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  51,280 रुपये तर 1 किलो चांदीचा दर - 61,160 रुपये एवढा आहे. तर पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur) येथे आजचा सोन्याचा दर 51,310 रुपये आहे.  1 किलो चांदीचा दर आज 57,700 रुपये असून कालच्या चांदीच्या दरापेक्षा आजच्या दरात तब्बल 1500 रुपयांनी वाढ झाली आहे.