Gold Jewellery (Photo Credit - Wikimedia )

दिवाळीच्या 5 दिवसांची सुरूवात आज (2 नोव्हेंबर) धनतेरस (Dhanteras) पासून होणार आहे. कुबेर जयंती म्हणून साजरा केल्या जाणार्‍या धनत्रयोदशीला (Dhanatrayodashi) सोनं (Gold) , चांदी (Silver) खरेदी करण्याची प्रथा आहे. भारतामध्ये यंदा दिवाळीत कोविड संक्रमण आटोक्यात असल्याने दिवाळी साजरा करण्याचा उत्साह नागरिकांमध्ये अधिक आहे. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. मग आज धनतेरसचा मुहूर्त साधत तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या विचारात आहात तर पहा आजचा सोन्याचा, चांदीचा प्रति तोळे दर काय? MCX वर सोन्या, चांदीची आज काय स्थिती आहे?

सध्या सोन्या, चांदीच्या किंमतीमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आज MCX वर सोनं 0.17% ने खाली आले असून ₹47,822 प्रति तोळा आहे तर चांदी 0.25% घसरून ₹64629 प्रति किलो आहे. कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी आता पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला जात असताना कोरोना परिस्थिती देखील आटोक्यात आल्याने यंदा धनतेरस आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात देखील ज्वेलर्सना चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर देखील कमी असल्याने ग्राहकांचा सोनं खरेदी कडे अधिक कल असेल असा अंदाज आहे. नक्की वाचा: Dhanteras Shubh Muhurat 2021: धनतेरस दिवशी सोन्या-चांदीची खरेदी, पूजा ते यमदीपदानाचा मुहूर्त, विधी पहा इथे.

मुंबई, पुणे सह महत्त्वाच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर काय?

  • मुंबई - सोनं 22 कॅरेट - ₹46,740,सोनं 24 कॅरेट - ₹47,740,चांदी प्रति किलो - ₹64,600
  • पुणे - सोनं 22 कॅरेट - ₹46,050,सोनं 24 कॅरेट -₹49,320,चांदी प्रति किलो ₹64,600
  • नागपूर - सोनं 22 कॅरेट -₹46,740,सोनं 24 कॅरेट -₹47,740,चांदी प्रति किलो ₹64,600
  • दिल्ली - सोनं 22 कॅरेट - ₹46,850,सोनं 24 कॅरेट- ₹51,100,चांदी प्रति किलो ₹64,600

मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या उच्चांकी स्तरापेक्षा आता सोनं 10 ग्राम साठी सुमारे 8500 रूपयांनी स्वस्त आहे. मागील वर्षी हा दर 56,200 होता.

2021 मध्ये, उद्योग 2019 च्या प्री-कोविड साथीच्या वर्षात परत येऊ शकेल. तथापि, सोन्याच्या किमती 2019 च्या पातळीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी जास्त आहेत. Gems and Jewellery च्या नॅशनल सर्वोच्च संस्थेच्या इंडस्ट्री एक्सपर्टच्या माहितीनुसार, 2019 च्या प्री-कोविड काळाच्या वर्षात सराफा बाजार परत येऊ शकेल. परंतू सोन्याच्या किमती 2019 च्या पातळीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी जास्त आहेत.