Gold-Silver Price Update: सोने, चांदी दरांमध्ये पाठीमागील दोन, तीन दिवस घसरण पाहिल्यानंतर पुन्हा एकदा वधार पाहायला मिळत आहे. आज (गुरुववार, 11 नोव्हेंबर 2021) सोने बाजारात झळाळी पाहायला मिळाली. मल्टी-कमोडिटी एक्चेंजवर सकाळी 9.30 वाजता सोने दर (Gold Rate) 156 रुपये म्हणजे 0.32% तेजी दाखवत होता. हाच दर प्रति ग्रॅम 49,010 रुपये इतका होता. चांदीबाबत सांगायचे तर 0.15 % म्हणजेच 102 रुपयांच्या वधारासह चांदी दर (Silver Price) 65,980 रुपये प्रति किलोग्राम राहिली.
आंतरराष्ट्रीय चांदी बाजारातही सोने वधारताना दिसले. GoldPrice.org ने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊच्या दरम्यान, MCX सोन्यात 1.04 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या वेळी सोने प्रति ग्रॅम 1,848.66 रुपये प्रति ग्रॅम इतक्या पातळीवर ट्रेंड करत होता. तर चांदी 1.71% तेजीसह 24.72 रुपये प्रति किलोग्रॅम इतक्या पातळीवर होती. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
22 कॅरेट- 45,650 रुपये
24 कॅरेट- 49,800 रुपये
मुंबई
22 कॅरेट- 47,260 रुपये
24 कॅरेट- 48,260 रुपये
कोलकाता
22 कॅरेट- 47,660 रुपये
24 कॅरेट- 48,260 रुपये
चेन्नई
22 कॅरेट- 45,460 रुपये
24 कॅरेट- 49,590 रुपये
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, चांदी प्रति किलो सरासरी 65,900 रुपए प्रति किलो दराने विक्री होताना दिसते आहे. राजधानी दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो 65,900 रुपए आहे. तर मुबई आणि कोलकाता शहरातही हेच दर आहेत. चेन्नई येथे मात्र चांदी 69,300 रुपए प्रति किलो दराने आहे.