आज, 3 फेब्रुवारीला सोने-चांदी (Gold - Silver) किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरातही (Silver Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या (Gold Rate Today) किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम (24K Gold Price) सोन्यासाठी 63,380 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 58,100 रुपये आहे, तर 18 कॅरेट सोन्याची 47,590 रुपये प्रतितोळा आहे. आज भारतात चांदीची किंमत 75.50 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे. (India Increases Import Duty On Gold-Silver: सरकारने सोने, चांदी, मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क 15% पर्यंत वाढवले)
मुंबईत सोन्याचा दर 63380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर, दिल्लीत सोनं 63530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा दर 63380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 63410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.