Gold | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) दरात चढ-उतार सुरुच आहेत. दिवाळीपर्यंत 50,000 च्या वर असलेले सोने तुळशीच्या लग्नादरम्यान 48,000 वर आले होते. मात्र हळूहळू या किंमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. Goodreturns नुसार आज मुंबईत (Mumbai) सोन्याचा दर प्रतितोळा 49,720 रुपये (24 Carat) आहे. तर 22 कॅरेट (22 Carat) सोन्याचा दर प्रतितोळा 48,720 रुपये इतका आहे. मागील काही दिवस सोन्याचा दर हा 49,000 ते 49,500 दरम्यान होता. मात्र यात थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

मार्गशीष महिना सुरु झाला असून पुढील महिन्यात मकर संक्रांत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.हेदेखील वाचा- Indian Economy: पुढील वर्षी भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील; Moody's ने वर्तवले सकारात्मक भविष्य

पाहूया मुंबई, नवी दिल्ली, चेन्नईसह महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचा आजचा दर

शहर 24 कॅरेट/प्रतितोळा 22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई 49,720 रुपये 48,720 रुपये
पुणे 49,720 रुपये 48,720 रुपये
चेन्नई 51,230 रुपये 46,950 रुपये
हैदराबाद 50,610 रुपये 46,410 रुपये
नवी दिल्ली 52,970 रुपये 48,770 रुपये
बंगळूरू 50,610 रुपये 46,410 रुपये

दरम्यान मुंबईत चांदीचा दर 68,200 रुपये किलो इतका झाला आहे. चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखले जाते?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.