Gold Rate on 27th July: कोरोना व्हायरस (Coronavirus) सारखी महामारी आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशात सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याने तर 50,000 चा टप्पा गाठला आहे. मुंबईत (Mumbai) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,941 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 49,981 प्रति तोळा इतका आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात होणारी वाढ डोळे चक्रावून टाकणारी आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो. या सणांमुळे अनेक लोक सोन्याचे दागदागिने बनवितात. त्यामुळे ही भाववाढ पाहता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असे म्हणायला हरकत नाही.
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊया. सोन्याचा दर goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- Gold Rate Today: रिटेल बाजारात सोन्याच्या दराने ओलांडला 50 हजारांचा टप्प; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 50,941 रुपये | 49,981 रुपये |
पुणे | 52,098 रुपये | 49,668 रुपये |
चेन्नई | 53,540 रुपये | 49,120 रुपये |
हैदराबाद | 53,549 रुपये | 49,129 रुपये |
नवी दिल्ली | 51,219 रुपये | 49,989 रुपये |
आजचा चांदीचा दर:
देशात चांदीच्या दराविषयी बोलायचे झाले तर, आज मुंबईत चांदीचा दर 50,800 प्रति किलो इतका आहे. नवी दिल्ली, चेन्नईत देखीलही चांदीचा हाच दर आहे.
देशातील कोरोनाबाधितांची 27 जुलै ची आकडेवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यानुसार, मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 49,931 नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 14 लाख 35 हजार 453 वर पोहचली आहे.