Gold Rate Today: रिटेल बाजारात सोन्याच्या दराने ओलांडला 50 हजारांचा टप्प; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव
Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Gold Rate in Mumbai: जगभरात कोरोना संकट (Coronavirus Pandemic) काळात कोलमडलेली अर्थव्यवस्था, भारतात रूपयामध्ये होत असलेली घसरण यांचा परिणाम सोने खरेदीवर  झाला आहे. दरम्यान महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबई (Mumbai) शहरामध्ये काल (1जुलै) रिटेल मार्केटमध्ये (Retail Market)  सोन्याचा दर प्रति तोळा 50 हजारांच्या पार गेला होता. पहिल्यांदाच सोन्याने हा उच्चांकी दर गाठला होता. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये घट झालेली आहे. goodreturns.in च्या रिपोर्ट्सनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर मुंबई मध्ये 48,660 रूपये प्रति तोळा इतका आहे.

जागतिक बाजारात स्पॉटचा दर प्रतीऔंस 1763 डॉलर इतका आहे. सोन्यात गुंतवणुकीचा कल जगभरात वाढलेला आहे. तसेच सोन्याकडे गुंतवणूकींच्या इतर पर्यायांपेक्षा सुरक्षित उपाय म्हणून पाहत असल्याने आता हा दर वाढत असल्याचा अर्थतज्ञांचा अंदाज आहे.

जाणून घ्या आजचे मुंबई शहरातील 22, 24 कॅरेट सोन्याचे दर काय?

मुंबई मध्ये आज सोन्याचा 22 कॅरेट सोन्याचा दर 47,650 रूपये प्रतितोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,650 रूपये प्रतितोळा आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच पुणे, नाशिक, नागपुर शहरातही सोन्याचा हाच दर नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचं संकट अजूनही जगभरात घोंघावत आहे. या संकटकाळात अनेक बड्या देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. अशामध्ये आता भारतानेही कोरोनाबाधितांचा 6 लाखाचा टप्पा आज ओलांडला आहे.

भारतामध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,04,641 वर पोहोचली असून एकूण 17,834 रुग्ण दगावले आहेत. तसेच काल (1 जुलै) 11,881 नवे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,59,860 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे. देशात सध्या 2,26,947 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.