देशात लॉकडाऊनच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) जबरदस्त वाढ झाली होती. ही वाढ दिवाळीपर्यंत कायम राहिली आहे. मात्र दिवाळीच्या शेवटच्या दिवसांत हे दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी मुंबईत सोन्याचा दर हा 48,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचा दर कमी होणे ही दिलासादायक गोष्ट असून लग्नघरातील लोकांसाठी देखील ही आनंदाची बाब होती. मात्र आता पुन्हा सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. goodreturns ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईत सोन्याचा आजचा दर हा प्रतितोळा 49,300 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 48,300 रुपये इतका आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आहेत. मध्यंतरीच्या काळात सोन्याचा दर 50,000 ते 55,000 च्या घरात पोहोचला होता. त्यानंतर तुळशीच्या लग्नादरम्यान हे दर थोडे 50,000 च्या खाली गेल्याचे पाहायला मिळाले.हेदेखील वाचा- RTGS च्या सुविधेचा नागरिकांना आता 24 तास लाभ घेता येणार, पैसे ट्रान्सफर करण्यासंबंधित जाणून घ्या अधिक
पाहूया मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह महत्वाच्या शहरांतील सोन्याचा आजचा दर
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 49,300 रुपये | 48,300 रुपये |
पुणे | 49,300 रुपये | 48,300 रुपये |
चेन्नई | 51,100 रुपये | 46,840 रुपये |
हैदराबाद | 50,500 रुपये | 46,300 रुपये |
नवी दिल्ली | 53,190 रुपये | 48,760 रुपये |
बंगळूरू | 50,500 रुपये | 46,300 रुपये |
तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील वधारले आहेत. मुंबईत चांदी 63 हजारांच्या वर पोहोचली आहे. सद्य स्थितीनुसार, मुंबईत चांदीचा भाव प्रतिकिलो 64,400 रुपये इतका आहे. तर चेन्नईत चांदीचा भाव प्रतिकिलो 68,000 रुपये इतका आहे.
दरम्यान सराफा दुकानामध्ये या दरांमध्ये थोडा बदल असू शकतो. तसेच सोनेच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये घडणावळ आणि टॅक्स हा वर खर्च असतो त्यामुळे यंदा सोनं खरेदी करताना हे सारे खर्च लक्षात घेऊन खरेदीचे प्लॅन बनवा.
एकीकडे सोन्या-चांदीच्या दरात होणारी ही वाढ तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरातही जबरदस्त वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशात अनेक राज्यांत पेट्रोल 90 च्या पार गेले आहे.