Gold Rate Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. वरच्या स्तरावरून झालेल्या विक्रीमुळे सराफांच्या किमतीत नरमाई आली आहे. एमसीएक्स गोल्ड एप्रिल फ्युचर्स 79 रुपयांच्या घसरणीसह 48,005 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, चांदीचा मार्च वायदा 356 रुपयांच्या घसरणीसह 61,147 रुपयांवर आहे.
बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा आणि चांदीचा भाव अनुक्रमे 48,084 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 61,503 रुपये प्रति किलो होता. (वाचा -7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते 20,484 रुपयांनी वाढ, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती -
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सोन्याच्या किमतीत $1,800 प्रति औंसच्या पातळीवरून थोडासा बदल झाला. स्पॉट गोल्ड 0049 GMT ने वाढून $1,807.39 प्रति औंस वर गेला. दरम्यान, यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून $1,808.00 वर आले. याशिवाय चांदीचा भाव 0.1टक्क्यांनी घसरून 22.59 डॉलर प्रति औंस झाला.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव पुढीलप्रमाणे -
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 44,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61,500 रुपये प्रति किलो आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 44,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61,500 रुपये प्रति किलो आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 44,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61,500 रुपये प्रति किलो आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,140 रुपये प्रति किलो आणि चांदीचा दर 65,600 रुपये प्रति किलो आहे.