साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडवा (Diwali Padwa) निमित्त अनेकजण सोनं खरेदी करतात. हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. मग दिवाळीच्या दिवसात आज(26 ऑक्टोबर) तुम्ही देखील सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पहा आजचा सोनं-चांदी खरेदीचा दर नेमका काय आहे? शुभ दिवसावर रीत म्हणून काही जण सोन्यामध्ये किमान गुंतवणूक तरी करतात. आता फिजिकल गोल्ड खरेदी ऐवजी हीच गुंतवणून डिजिटली करून विविध रूपात केली जाऊ शकते. त्याचेदेखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे देखील नक्की वाचा: Diwali Padwa 2022 Wishes: दिवाळी पाडव्यानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या खास शुभेच्छा!
सोनं हे दागिन्यांच्या किंवा कॉईन, वळी, बिस्कीट अशा रूपात खरेदी केल्यास त्याला सुरक्षित ठेवणं हे देखील अनेकदा जिकरीचं होतं. त्यामुळे आता सोन्याला बॉन्ड्सच्या स्वरूपात देखील विकत घेण्याचा पर्याय आहे. पण आगामी लग्नसराईचा काळ पाहता तुम्हांला सोनं, चांदी फिजिकल गोल्डच्या स्वरूपातच खरेदी करायचं असेल तर पहा आजचा सोन्याचा दर.
आजचा सोन्याचा दर काय ?
goodreturns च्या माहितीनुसार, आज सोन्याचा 24 कॅरेट साठी सोन्याचा दर प्रति तोळे 51,110 रूपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी दर 46,850 रूपये झाला आहे. सोन्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत आज घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान आज चांदीचा प्रतिकिलो दर हा 58,000 आहे. आज चांदीचा दर मात्र कालच्या तुलनेत वधारला आहे.
सोनं दागिन्याच्या माध्यमात करायचं असल्याचं ते 22 कॅरेट मध्ये केले जाते. तर गुंतवणूक घेत असल्यास 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध असल्याने त्याची गुंतवणूक म्हणून बिस्कीट, वळी, नाणं म्हणून निवड केली जाते. दरम्यान शहरानुसार आणि सराफा दुकाना नुसारही सोनं विकण्याचा, खरेदी करण्याचा दर हा वेगवेगळा असतो.