Gold Rate on Dhanteras 2020: धनत्रयोदशीच्या पार्श्वभुमीवर मुंबई, पुणे, दिल्लीसह 'या' ठिकाणचे आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Gold | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशभरात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर आजचे सोन्याचे दर सुद्धा कमी झाल्याचे बाजारात दिसून आले आहे. Good Returns यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील आजचे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 53,620 रुपये झाले आहेत. तर चांदी 62,700 रुपये प्रति ग्रॅम झाले आहे. नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचे दर कमी होत 49,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.(Dhanteras 2020: Paytm, GooglePay आणि Broker Firms च्या माध्यमातून कशी कराल डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या)

एचडीएफसी सिक्युरिटीज यांच्या नुसार, गुरुवारी सोन्याचे दर 81 रुपयांनी कमी होत 50,057 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर येथे जाणून घ्या मुंबई, पुणे, दिल्लीसह 'या' ठिकाणचे आजचे सोन्याचे दर. तर Good Returns यांनी दिलेले सोन्याचे दर पुढील प्रमाणे:-

>>मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर- 50,870 रुपये

>>पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचे दर- 50,770 रुपये

>>दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचे दर- 53,630 रुपये

>>कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 53,540 रुपये

>>हैदराबाद येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 51,760 रुपये

भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात. गुंतवणूक म्हणून तुम्ही सोन्याकडे पाहत असाल तर नोव्हेंबर महिन्यातील सरकारी गोल्ड बॉन्ड्सची यंदा 13 नोव्हेंबरला मुदत संपत आहे. यामध्ये तुम्ही प्रति ग्राम रूपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता.