Gold Rate Today: भारतात सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्ली सह महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Gold Rate On 8th December: दिवाळीनंतर सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झालेली पाहायला मिळाली. मात्र आजचे भाव पाहता सोन्याच्या दरात (Gold Rate) जबरदस्त घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात 9000 रुपयांची घसरण झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. आजच्या बाजारभावानुसार, मुंबईत (Mumbai) 24 कॅरेट सोन्याचे (@4 Carat Gold) दर प्रति तोळा 47,150 रुपये इतके आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) भाव प्रति तोळा 46,150 रुपये इतका आहे. तर नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 50,420 रुपये इतका झाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भाव किंमती 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.हेदेखील वाचा- Gold Rate Today: आज सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, पहा आजचा भाव!

पाहूयात goodreturns नुसार, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नईसह महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे आजचे दर (8th February)

शहर 24 कॅरेट/प्रतितोळा 22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई 47,150 रुपये 46,150 रुपये
पुणे 47,150 रुपये 46,150 रुपये
चेन्नई 48,630 रुपये 44,580 रुपये
हैदराबाद 48,070 रुपये 44,060 रुपये
नवी दिल्ली 50,420 रुपये 46,220 रुपये
बंगळूरू 48,070 रुपये 44,060 रुपये

दरम्यान अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युडी कमी झाली असली तरीही अर्थमंत्र्यांनी सोन्यावर, चांदीवर 2.5% अधिभार लावणार असल्याची माहिती दिली आहे. पण प्रामुख्याने हा फायदा सोनारांना आहे पण सोनार हा फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहचवणार यावर ग्राहकांसाठी सोनं किती व कसं स्वस्त होणार हे अवलंबून असेल.

शुद्ध सोने कसे ओळखले जाते?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.