Gold | fille Image

Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold) दरात वाढत आहे. आगामी काळात सोन्याचा हाच दर एक लाख रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोन्या आणि चांदीची सध्याची वेगवान दरवाढ पाहता 2024 च्या अखेरीस किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल असे संकेत दिले जात आहेत. दरम्यान अमेरिकन डॉलरचा दर आणि यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये सतत वाढ होत असतानाही सोन्याच्या किमतीने सलग चौथ्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73 हजार 130 रुपये आहे. तर चांदी 83 हजार 850 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. (हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरात भाव किती? घ्या जाणून)

सोने दरवाढीची कारणे

इराण आणि इस्रायलमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. वाढत्या तणावामुळे सोन्याचे दर वाढू लागले आहेत. त्याशिवाय, त्याला वाढत्या जागतिक महागाईचा फटका बसत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रथमच $2400 डॉलरवर पोहोचला आहे.

इतर शहरातील सोनं -चांदीचे दर

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,908 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,908 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 72,990 रुपये आहे.