Gold Silver Rate Today : डिसेंबर 2023 नंतर थेट मार्च महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना तारे दाखवले आहे. सोने-चांदीच्या दरांनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अवघ्या दहा दिवसांतच दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठला. सोने दहा दिवसांत 3,430 रुपयांनी वधारले. तर चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. या बंपर तेजीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. सध्या सोने 65 ते 66 हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या वर्षात सोने अजून किती मोठा पल्ला गाठणार? आणि या दरवाढीमागे नेमके कारण तरी काय? असा ग्राहकांना प्रश्न पडला आहे. (हेही वाचा: Sovereign Gold Bond Scheme: SBI ते SGB मध्ये ऑनलाइन गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 1 मार्चला सोन्याच्या किंमती 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी वाढल्या. त्यानंतर, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. 9 मार्च रोजी 540 रुपयांची वाढ झाली. (हेही वाचा :Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव आता 75,700 रुपये आहे. मार्चमध्ये चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. तर या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी चांदीत इतकीच वाढ झाली. 9 मार्च रोजी 200 रुपयांनी किंमत वाढली.