गोवा: वागाटोर येथील विला मधील रेव्ह पार्टीत पोलिसांची धाड; 20 जणांना अटक, 9 लाखाचे ड्रग्ज जप्त
Goa Rave Party (Photo Credits: Twitter)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक हॉटेल्स सध्या सुरळीत सुरु झालेले नाही. असे असताना देखील गोव्यातील एक विलामध्ये सुरु असलेली रेव्ह पार्टी (Rave Party) पोलिसांनी उधळून लावली. गोव्याच्या (Goa) वागाटोर येथील फ्रेंगिपेनी विलामध्ये शनिवारी रात्री रेव्ह पार्टी सुरु असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून या रेव्ह पार्टीत झाड टाकली. या पार्टीतील 20 जणांना अटक केली असून 9 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. गोवा पलिसांनी ही कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन पूर्णपणे उठविला असून अनलॉकच्या माध्यमातून टप्प्याटप्याने सुरु होत आहे. मात्र काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाही. त्यातच गोव्यात झालेल्या रेव्ह पार्टीने या परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे यात 9 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी FIR दाखल करम्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेदेखील वाचा- Coronavirus Update: देशात 63,489 नव्या रुग्णांंसह आज कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 25,89,682 वर; मृत्यु दर 2 टक्क्यांवर पोहचला

गोव्यात सद्य घडीला 3753 रुग्णांवर उपचार सुरु असून 7488 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 98 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान भारतात कोरोनाबाधितांची संख्या 25,89,682 वर पोहचली आहे. यापैकी 6,77,444 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत तर 18,62,258 जणांंना आजवर डिस्चार्ज देण्यात आलाय. मागील 24 तासात देशात 944 मृत्युंची नोंंद होऊन आजवरच्या एकुण मृतांंचा आकडा 49,980 वर पोहचला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंंत्रालयाने माहिती दिली आहे