गोवा सरकारने (Goa Government) आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यात कॅसिनो (Casinos) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी 1 नोव्हेंबरपासून गोव्यामध्ये कॅसिनो सुरु होतील. कोरोना साथीच्या सुरूवातीस यावर्षी मार्चपासून गोव्यात कॅसिनो बंद होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले की गोव्यातील कॅसिनो 50 टक्के क्षमतेसह 1 नोव्हेंबरपासून सुरू होतील. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कॅसिनो पन्नास टक्के क्षमतेसह उघडतील आणि राज्य गृह खात्याने दिलेल्या मानक कार्यप्रणालीचे अनुसरण करतील. सावंत म्हणाले की कॅसिनो उघडण्यापूर्वी ऑपरेटरला परवाना फी भरावी लागेल. याआधी गोव्यातील कॅसिनो ऑपरेटकर्सनी सावंत यांच्याकडे कॅसिनो ऑपरेट करण्यास परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी फक्त चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आज राज्यात कॅसिनोही उघडण्यास परवानगी दिली.
गोवा हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कॅसिनो हे मुख्य आकर्षक आहे. सध्या कोरोनाच्या अनेक नियमांमध्ये शिथिलता आणली गेल्याने गोब्यात पर्यटन व्यवसाय तेजीत सुरु आहे, अशात कॅसिनो उघडण्यास परवानगी दिली गेल्याने या व्यवसायाला हातभार लागू शकेल. गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी यूके आणि रशियामधील बहुतेक पर्यटक इथे येतात. यावर्षी कोरोना साथीच्या साथीमुळे गोव्यात पर्यटकांची हालचाल कमी झाली आहे. मात्र आता परिस्थिती सुधारत असताना पुन्हा एकदा पर्यटक गोव्याच्या दिशेने जाऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत एअरलाइन्स कंपन्यांनीही गोव्यात उड्डाणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Ban on International Flights Extended: आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील निर्बंध 30 नोव्हेंबर पर्यंत कायम- DGCA)
दरम्यान, गोव्यात काल कोरोना विषाणूच्या 215 नवीन घटनांची पुष्टी झाल्यानं,तर राज्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 42,747 वर पोहोचली आहे आणि रिकव्हरी रेट 93.05 टक्के झाला आहे.