Goa Assembly Election Results 2022: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेसह देशभरातून उत्सुकता होती. गोव्यात सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधातील काँग्रेस अशा दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये सामना रंगला असला तरी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि मगोप पक्षानेही जोरदार ताकद लावली होती. त्यामुळे या राज्यात कोणता पक्ष आघाडी घेईल याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात भाजप आघाडी घेताना दिसतो आहे. गोव्यात काँग्रेसच्या आघाडीबाबत कोणते घटक महत्त्वाचे ठरले घ्या जाणून.
- गोव्यामध्ये भाजपने आपल्या खास स्टाईलमध्ये आक्रमक प्रचार केला.
- गोव्यात मजबूत असलेले भाजपचे संघटन.
- पंजाब वगळता सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी देण्याचा जनतेमध्ये असलेला ट्रेण्ड.
- भाजपचे उमेदवार इतरपक्षांच्या तुलनेत सर्वार्थाने तगडे होते.
- केंद्र सरकार आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर गोव्यातील जनतेने दाखवलेला विश्वास.
- गोव्यामध्ये स्थानिक नेतृत्वाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय.
दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.