बलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गुवाहाटी (Guwahati) रेल्वे स्थानकावर कामच्या शोधात वणवण फिरणाऱ्या एका तरुणीला 65 वर्षीय वृद्धाने काम मिळवून देतो असे आश्वासन दिले. तसेच या वृद्धाने तिला अजून एका तरुणीसोबत ग्वालियार येथे कामासाठी पाठवण्यात आले. परंतु कामासाठी गेलेल्या या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने तरुणीला माझ्याशी लग्न कर किंवा वेशाव्यवसाय कर अशी गळ घातली,

पश्चिम बंगाल आणि आसाम येथील दोन अनाथ तरुणींना कामा मिळवून देतो असे सांगून त्यांना मुन्ना खान या व्यक्तिला विकले. या दोघींना खान हा वेशाव्यवसायात ढकलण्याच्या तयारीत होता. परंतु पीडित तरुणीने त्याच्या तावडीतून पळ काढत पोलिसात खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचताच आरोपीने तेथून पळ काढला आहे.(हेही वाचा-धक्कादायक! हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये महिला रुग्णावर सामुहिक बलात्कार; नर्सने इंजेक्शन देऊन केले होते बेशुद्ध)

सुरुवातीला पोलीस तपासणीत असे समोर आले होते की, ग्वालियार येथे तरुणींची तस्करी केली जात असल्याचा गोरखधंदा खुप दिवसांपासून सुरु होता. यामध्ये आरोपीची बायकोसुद्धा सहभागी आहे. मात्र पोलिसांनी या दोन्ही तरुणींची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.