सोशल मीडीयावर तरूण मुलांना ब्लॅकमेल करून अडकवणारी आरोपी अटकेत; जाळ्यात अडकवण्यासाठी रचते 'ही' कहानी!
Representative image

छत्तीसगड मध्ये सरगुजा पोलिसांनी ब्लॅकमेलिंगच्या (Blackmailing) आरोपाखाली एका मुलीला अटक केली आहे. ही मुलगी सोशल मीडीयामध्ये तरूणांना आपण गरीब असल्याचं सांगत ब्लॅकमेलिंग करत पैसे उकळत होती. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा अंबिकापूर मधील निवासी महिलेने तिच्याविरूद्ध तक्रार नोंदवली. महिलेने तिच्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली असल्याचं म्हटलं आहे. सोबतच पती आणि मुलाला देखील धमकावल्याचं तिनं म्हटलं आहे.

महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आरोपी तरूणी ब्लॅकमेलिंग करत असल्याचं उघड झालं. हे प्रकरण गांधीनगर पोलिस स्टेशन मधील आहे. अंबिकापूरच्या दर्रीपाराची रहिवासी प्रेमा साहू (जोया) ची सोशल मीडीयावर वेगवेगळ्या नावाने अकाऊंट्स आहेत. ही तरूणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती. नंतर लग्नासाठी दबाव टाकून ब्लॅकमेल करत होती. पैसे मिळाले नाही तर रेप केस टाकण्यासाठी देखील पोलिस स्टेशन मध्ये जात होती.

प्रेमा साहूचं पितळ तेव्हा उघडं पडलं जेव्हा तिच्या विरूद्ध एका महिलेने गांधीनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली की ही तरूणी सोशल मीडीयावर फेक आयडी बनवून उलट सुलट गोष्टी लिहित आहे. मुलावरही खोटे आरोप करून त्याला जेलवारी घडवली. 3 महिने मुलगा जेल मध्ये राहिल्यानंतर इतर नातेवाईकांनाही त्रास दिला. नक्की वाचा: Chhattisgarh: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; पत्नीने मारहाण करत काढली नग्नावस्थेत धिंड, 4 जणांना अटक.

तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, ही आरोपी तरूणी जे कारण पुढे करत होती त्यामध्ये 'तिची सावत्र आई आणि वडिलांचं निधन झाले आहे. वडिलांनी सारी संपत्ती तिच्या नावावर केली आहे आणि आई ती संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे. तिला मारण्याचा प्रयत्न करते.' दरम्यान असा बनाव रचून आरोपी तरूणांकडे मदतीचं आवाहन करते. मग तरूणांना एक दोन ठिकाणी बोलावून ब्लॅकमेलिंग करते.

पोलिस सध्या या तरूणीसोबत इतर कुणी काम करत आहेत का? याचा देखील शोध घेत आहेत.