Chhattisgarh: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; पत्नीने मारहाण करत काढली नग्नावस्थेत धिंड, 4 जणांना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक उरींदबेरा गावात तपासासाठी रवाना झाले. पीडितेच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पत्नीसह चार गावकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे

Chhattisgarh: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; पत्नीने मारहाण करत काढली नग्नावस्थेत धिंड, 4 जणांना अटक
Representative image

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कोंडागाव जिल्ह्यात एका प्रेमी युगुलासोबत अमानुष व्यवहाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फरासगाव ब्लॉकमधील बरकई येथे एका विवाहित तरुणाला दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडणे महागात पडले. या तरुणाच्या पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसह एका खोलीत पकडले. यावर तिने बराच गोंधळ घातला. पतीच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने गावकऱ्यांनाही गोळा केले. यानंतर गावकऱ्यांनी शिक्षा म्हणून आधी तरुण आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण केली, नंतर त्यांचे कपडे काढले व दोघांचीही नग्नावस्थेत संपूर्ण गावात धिंड काढली.

याप्रकरणी आता पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी मंगळवारी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की, 11 जून रोजी जिल्ह्यातील उरींदबेरा गावात एका महिलेने आपल्या पतीला एका तरुणीसोबत संशयास्पद अवस्थेत पाहिल्यानंतर ती संतप्त झाली. त्यानंतर तिने गावकऱ्यांसोबत दोघांनाही मारहाण कडून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली. (हेही वाचा: बहिणीने केला आंतरजातीय विवाह, भावाने जेवण्यासाठी घरी बोलवून जोडप्याची केली हत्या)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक उरींदबेरा गावात तपासासाठी रवाना झाले. पीडितेच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पत्नीसह चार गावकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व आदिवासी समाजाचे कोंडागाव जिल्हा प्रवक्ते वीरेंद्र नेताम म्हणाले की, या घटनेने संपूर्ण समाजाला लाज आणली आहे. आदिवासी समाज 2 लग्नांना परवानगी देतो, मात्र असे असतानाही गावातील सरपंच व इतर काही लोकांनी प्रेमी युगुलावर अत्याचार केला आहे. दरम्यान, याआधीही रायपूरमध्ये खाण खात्यातील एका अधिकाऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध असल्याने त्याच्या पत्नीने आपल्या मुलीसह पतीला मारहाण केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2022 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).