Ghaziabad: हॉटेलमध्ये रोटी बनवत असताना पीठावर थुंकत असल्याचा पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

Ghaziabad:  सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये व्यक्तीचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका हॉटेलमध्ये रोटी बनवत असताना त्याच्या पीठावर थुंकत असल्याचे घाणेरडे कृत्य केल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्याची जोरदार मागणी केली जात होती. त्यामुळे आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.(Thane: देवळातील पैशांची पेटी चोरण्यासाठी भामट्याने लढवली शक्कल, आधी पडला पाया नंतर मारला डल्ला)

लोनीचे सीओ रजनीश उपाध्याय यांनी ANI यांना सांगितले की, हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात केल. तर लोनी परिसरातील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले. सीओ यांनी म्हटले की, आरोपी व्यक्तीची चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याच्या विरोधातील आरोप खरा असल्यास कारवाई केली जाईल.(Viral Video: अरे बापरे..! हा ट्रक आहे की बाईक? व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरवा)

Tweet:

यापूर्वी सुदअधा गाजियाबाद येथे अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हा ही एक व्यक्ती रोटी आणि नान बनवताना त्यावर थुंकी लावायचा. व्हायरल व्हिडिओत आरोपी तंदुरी रोटी तयार करत होता. रोटी तयार करताना त्याच्या पीठावर थुंकल्यानंतर ती तयार करुन भट्टीत भाजण्यासाठी टाकत असे. ऐवढेच नव्हे तर तो जो प्रकार करत होता त्यावेळी तेथे काही जण उपस्थितीत असल्याचे ही दिसून आले होते.