मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन कोसळला; चालकासह दोन जण गंभीर जखमी
Representational Image (Photo Credit: File Photo)

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmedabad National Highway) आज (बुधवार, 6/2/2019) सकाळी गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. टँकरचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हा गॅस टँकर गुजरातवरुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने मुंबईला येत होता. त्या दरम्यान चारोटी-गुलजारी पुलाजवळ ही घटना घडली. टँकरचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात दुचाकीला टँकरची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे आणि टँकर चालक गंभीर जखमी झाले आहेत.

गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षिततेसाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. मात्र या अपघाताचा परिणाम राष्ट्रीय महामार्गाने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर झाल्याने वाहतूक काहीशी मंदावली आहे.