
Commercial LPG Price Hike: आजपासून देशभरात एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या किमती वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG )च्या किमतीत प्रति सिलिंडर 6 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1803 रुपयांना विकला जात आहे. या बदलानंतर, तुमच्या शहरात एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे? ते जाणून घ्या.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ -
1 मार्च रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1803 रुपये प्रति सिलिंडर दराने विकला जात आहे. पूर्वी ते प्रति सिलिंडर 1797 रुपयांना विकला जात होता. आता दिल्लीत प्रति सिलिंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ झाली आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तेवढीच वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा -Bank Holidays in March 2025: मार्चमध्ये बँका किती दिवस बंद राहतील? जाणून सुट्ट्यांची संपूर्ण यादी)
आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 6 रुपयांनी वाढून 1755 रुपये झाली आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये ते प्रति सिलिंडर 1749 रुपयांना विकले जात होते. याशिवाय, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1913 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1965 रुपयांना उपलब्ध आहे. (वाचा - Rule Change From 1 March: 1 मार्चपासून UPI, LPG आणि म्युच्युअल फंडसह बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम)
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही -
दरम्यान, 14.2 किलोग्राम घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 मार्चपासून दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर त्याच्या जुन्या दराने 803 रुपये उपलब्ध आहे. तेल कंपन्यांनी शेवटचे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 9 मार्च 2024 रोजी बदलल्या होत्या. तेव्हापासून गॅसच्या किमती स्थिर आहेत.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती -
तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत, दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपये प्रति सिलिंडर या दराने विकला जात आहे. ते कोलकातामध्ये 829 रुपयांना आणि मुंबईत 802.50 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, येथे घरगुती सिलिंडर प्रति सिलिंडर 818.50 रुपयांना उपलब्ध आहे.