
Bank Holidays in March 2025: मार्च महिना सुरू होण्यासाठी अगदी कमी दिवसांचा कालावधी उरला आहे. मार्चमध्ये, शनिवार आणि रविवार वगळता, देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बँका एकूण 7 दिवस बंद राहतील. मार्चमध्ये दोन प्रमुख सण साजरे करण्यात येणार आहेत. याशिवाय, काही स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील. 14 मार्च रोजी होळीनिमित्त देशभरात सुट्टी असेल, तर 31 मार्च रोजी ईदमुळे देशातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. मार्चमध्ये कोणत्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेऊयात.
दरम्यान, 8 आणि 22 मार्च रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 8 मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि 22 मार्च हा महिन्याचा चौथा शनिवार असेल. याशिवाय, देशभरातील बँका 2,9,16, 23 आणि 30 मार्च रोजी रविवार असल्याने बंद राहतील. मार्चमध्ये एकूण 7 सुट्ट्या असतील, ज्यामध्ये 2 शनिवार आणि 5 रविवार असतील. (हेही वाचा - BMC Clerk Result 2025 Out: बीएमसी कडून Executive Assistant पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर; portal.mcgm.gov.in वर पहा यादी)
मार्चमधील बँकांची सुट्ट्यांची यादी -
- 7 मार्च रोजी छपचार कुटनिमित्त मिझोरममधील सर्व बँका बंद राहतील.
- 13 मार्च रोजी होलिका दहन आणि अट्टुकल पोंगलनिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि केरळमधील सर्व बँका बंद राहतील.
- 14 मार्च रोजी होळीचा मोठा सण असल्याने, त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ आणि नागालँड वगळता देशातील सर्व बँका बंद राहतील.
- होळी आणि याओशांग सणाच्या निमित्ताने 15 मार्च रोजी त्रिपुरा, ओडिशा, मणिपूर आणि बिहारमधील सर्व बँका बंद राहतील.
- 22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमधील सर्व बँका बंद राहतील.
- 27 मार्च रोजी शब-ए-कद्रनिमित्त जम्मू-काश्मीरमधील सर्व बँका बंद राहतील.
- 28 मार्च रोजी जुमात-उल-विदानिमित्त जम्मू-काश्मीरमधील सर्व बँका बंद राहतील.
- 31 मार्च रोजी ईद-उल-फित्रनिमित्त मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
- बिहारमध्ये 14, 15 आणि 16 मार्च रोजी सलग तीन दिवस बँका बंद राहतील.
याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये 27, 28, 30 आणि 31 मार्च रोजी बँका बंद राहतील.
दरम्यान, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत आरबीआयच्या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार, मार्चमध्ये बँका अनेक सुट्ट्यांसाठी बंद राहतील. यामध्ये होळी आणि ईद-उल-फित्र सारख्या उत्सवांचा समावेश आहे, काही सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार बदलतात.