धक्कादायक! 5 हजाराच्या कर्जासाठी 13 वर्षांच्या मुलीवर 7 जणांचा सामुहिक बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

बलात्काराच्या (Rape) घटनेबाबत कितीही कायदे कडक झाले, मात्र तरी या घटना काही थांबत नाहीत. आता गुजरात येथे केवळ 5 हजार रुपयांसाठी 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर येत आहे. एका व्यक्तीने त्याच्या जवळच्या काही मित्रांकडून 5000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र जेव्हा ही रक्कम परत केली गेली नाही, तेव्हा कर्ज देणाऱ्या व्यक्तींनी कर्जदाराच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर या मुलीवर बलात्कार केला. याबाबत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार कर्ज परत मिळवण्यासाठी कर्जदाराच्या 13 वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले गेले. तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन 7 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कशीतरी ही मुलगी पोहचली व तिने आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्जाची रक्कम लवकर मिळाली नाही हे पाहून, कर्ज देणारी व्यक्ती कर्जदाराच्या घरी जावू लागली. तिथेच त्याने या मुलीला पहिले.

त्यानंतर मुलीला नोकरी देतो से सांगून तिला बोलण्यात फसवले व नंतर तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 महिन्यांपासून भरत त्याच्या सहा मित्रांसह तिच्यावर लैंगिक शोषण करत होता. मात्र भीती व निंदा यामुळे तिने ही गोष्ट कोणालाही सांगतली नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती अस्वस्थ राहू लागल्याने, आईने चौकशी केली. त्यानंतर पीडितेने संपूर्ण घडलेली गोष्ट सांगितली. (हेही वाचा: बलात्कार करणाऱ्या दोषीला जगातील 'या' देशात आहेत कठोर शिक्षा; पाहा काय आहे शिक्षेचं स्वरूप)

भारत दरबार, जगदीश मायानी, संदीप गुप्ता, भरत बरवडिया, कौशिक, सुनील वाघेला आणि योगेश सेजलिया यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.