गलवान वॅली (Photo Credits-Twitter)

Galwan Vally First Annivarsary:  गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्भुमीवर भारतीय सेनेकडून याचा एक व्हिडिओ जाहीर केला आहे. यामध्ये गलवानचे वीर अशा नावाने हा व्हिडिओ असून त्यात भारतीय सेनेच्या शूरवीरांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे. 4.59 सेकंदाच्या या व्हिडिओत भारतीय सेनेच्या वीरांचा उल्लेख केला आहे. प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी या व्हिडिओला आपला आवाज दिला आहे. दरम्यान, गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारतीय सेनेचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनी सैनिकांचे 40 हून अधिक जण मारले गेले होते.

व्हिडिओत सीमेवरील दुर्गम परिस्थितींचा सामना करणारे जवान, तमाम आधुनिक शस्रे आणि भारतीय जवानांचे शौर्य आणि पराक्रम दाखवण्यात आला आहे. बर्फाने आच्छादलेल्या डोंगरकड्यांवर जेथे शून्य पेक्षा कमी तापमान आहे तेथे जवानांनी आपल्या शूरतेने दुश्मनांचा सामना केला आणि देशाचे रक्षण केले. या विशेष व्हिडिओत या सर्वांची झलक दाखवण्यात आली आहे. गाण्याच्या अखेरीस गलवान मध्ये शहीर झालेल्या जवानांची नावे आणि फोटो सुद्धा दाखवण्यात आले आहेत.(राष्ट्रीय युद्ध स्मारकावर झळकणार लडाख मधील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांची नावे)

Video:

दरम्यान, गेल्या 5 दशकातील या प्राणघातक झटापटीत 20 भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांचाही समावेश होता. तर पूर्व लडाख मधील भारतीय सीमेवर दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला होता. यावेळेस चीनकडून करण्यात आलेला हल्ला पूर्व नियोजित होता. गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंड नंबर 14 जवळ चीन अतिक्रमण करत असल्याचे दिसल्याने भारतीय जवानांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीनी सैन्याने मोठी दगडं. खिळे मारलेले लाकूड, लोखंडाचे रॉड यांचा वापर करुन भारतीय सैन्यावर भीषण हल्ला केला होता.