French President Macron आज जयपूरच्या दौर्‍यावर; PM Narendra Modi यांच्यासोबत करणार रोड शो
PM Modi | Twitter

यंदाच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती Emmanuel Macron हजेरी लावणार आहे. दिल्लीतील कार्यक्रमापूर्वी ते आज जयपूर मध्ये येणार आहे. पंतप्रधान मोदींसोबत त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते जयपूर मधील प्रसिद्ध स्थळांना भेटी देणार आहेत. ज्यामध्ये जंतर मंतर, हवा महल, अंबर फोर्ट आणि अल्बर्ट हॉल याचा समावेश आहे. राजस्थान हे पर्यटकांच्या दृष्टीने लोकप्रिय स्थळ असल्याने येथील संस्कृतीचा, नैसर्गिक सौंदर्याचा नजारा दाखवण्यासाठी आजचा दोन्ही पंतप्रधानांचा सुमारे 6 तासांचा एकत्र दौरा आहे. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत. या दौर्‍यामध्ये UPI चा वापर करून  Emmanuel Macron काही खरेदी देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. UPI in France: सिंगापूर नंतर आता युरोपात फ्रांस ठरला पहिला देश जेथे भारतीय करू शकतात UPI द्वारा व्यवहार .

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये फ्रेंच सशस्त्र दलांची तुकडी देखील परेडमध्ये सहभागी होईल आणि भारतीय सैन्य आणि विमान चालकांसोबत फ्लायपास्ट करणार आहे. उद्या 9.30 वाजता दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांच्या भारत दौर्‍यामध्ये भारतीय विद्यार्थी, कलाकार, गुंतवणूकदार आणि पर्यटकांसाठी अधिक संधी निर्माण करण्याच्या फ्रान्सच्या वचनबद्धतेवर जोर दिला जाणार आहे. फ्रान्सच्या "मेक इट आयकॉनिक" नेशन-ब्रँडिंग मोहिमेच्या बॅनरखाली या भेटीदरम्यान व्यावसायिक संबंध आणि क्रॉस-गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल, ज्याने भारताला प्राधान्य देश म्हणून लक्ष्य केले आहे. Republic Day 2024 Maharashtra Tableau: यंदा प्रजासत्ताक दिनावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला समर्पित असेल महाराष्ट्राचा चित्ररथ; जाणून घ्या काय आहे संकल्पना .

मॅक्रॉन यापूर्वी मार्च 2018 मध्ये भारत भेटीवर आली आणि सप्टेंबर 2023 मध्ये दिल्ली G20 शिखर परिषदेसाठी अधिकृत भेटीवर भारतात आले होते. भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून मॅक्रॉनचा भारत दौरा हा फ्रान्सचा सहावा सहभाग आहे, जो इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे. 14 जुलै 2023 रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे दिवशी त्यांनीही PM मोदींना बोलावून सन्मानित केले होते.