CRPF च्या जवानांनी सुकमा येथे आपल्याच सहकाऱ्यांवर केला गोळीबार, 4 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी
CRPF Jawan Injured (Photo Credits-ANI)

छत्तीसगढ येथील सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार येथील मरईगुडाच्या लिंगनपल्ली कॅम्पमध्ये एका सीआरपीएफच्या जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. या प्रकरणी चार जवानांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर रुपात जखमी झाले आहेत. यामधील 1 जवानाची प्रकृती अधिक गंभीर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मरईगुडाच्या लिंगनपल्ली कॅम्पमध्ये एका गोष्टीवर सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या जवानांमध्ये वाद झाला. हा वाद ऐवढा टोकाला गेला की, एका जवानाने गोळीबार सुरु केला.

गोळीबारात काही जवान सुद्धा जखमी झाले आहेत. सर्वांना रायपुर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेसंबंधित कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृत विधान केलेले नाही. मात्र आरोपी जवान याला ताब्यात घेण्यात आले आहे.(Jammu Kashmir Update: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, हल्लेखोरांचा शोध सुरू)

Tweet:

'

सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गावातील पाच लोकांचे अपहरण केले आहे. त्यानंतर सुरक्षा बलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी असे म्हटले की, कोंटा ठाण्याच्या जंगलाच्या 18 किमी दूर स्थित गावात ही घटना घडली आहे. हा परिसर राजधानी रायपुर पासून 400 किलोमीटर दूर आहे.

सुकमा पोलीस अधिकक्षक सुनील शर्मा यांनी असे म्हटले की, प्राथमिक माहितीनुसार नक्षलवाद्यांचा एक समूह शनिवारी संध्याकाळी गावात पोहचले आणि सातवीच्या विद्यार्थ्यासह पाच जणांना जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेले. तर लोकांचे अपहरण का करण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही.