प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी केंद्रीय मंत्री कमल मोरारका यांचे निधन (Kamal Morarka Passes Away) झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. मुंबई (Mumbai) येथे शुक्रवारी सांयकाळी 6 वाजणेच्या दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कमल मोरारका (Kamal Morarka) हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. कमल मोरारका हे 1990-91मध्ये पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्री मंत्री होते. त्यानंतर ते 1988 ते 1994 पर्यंत ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्यही राहिले होते.
राजस्थानच्या नवलगढ येथील निवासी असलेले मोरारका यांनी सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भागातील सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी एमआर मोरारका जीडीसी रुरल रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. (हेही वाचा, Buta Singh Passes Away: काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवीन जिंदल, राहुल गांधी यांनी ट्विटवर वाहिली श्रद्धांजली)
पूर्व केंद्रीय मंत्री एवं नवलगढ़ के मशहूर उद्योगपति, श्री कमल मोरारका जी निधन से स्तब्ध हूं। हम सभी के लिए यह अपूरणीय क्षति है।
परमपिता परमेश्वर से प्रार्थना है पुण्यात्मा को अपने चरणों में स्थान दें व शोक संतप्त परिवार को यह दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।@KamalMorarka pic.twitter.com/hu7JlynMT6
— Dr.Rajkumar Sharma (@DrRKSOfficial) January 15, 2021
कमल मोरारका यांनी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांनी सर्वात प्रथम ऑर्गेनिक शेतीच्या बाबतीत विचार करण्यास सुरुवात केली. उद्योगपती, सामाजसेवा आणि राजकारणी असण्यासोबतच त्यांना कृषी क्षेत्राचीही चांगली जाण होती. त्यांनी नवदच्या दशकात त्यांनी ऑर्गेनिक शेतीला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसोबत जोडले. त्यांनी स्थापन केलेली संस्थाही याच क्षेत्रात काम करते आहे.