छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Former Chhattisgarh Chief Minister Ajit Jogi (PC - Facebook)

छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्याचे माजी मुख्यमंत्री (Former CM) अजीत जोगी (Ajit Jogi) यांचे आज (29 मे, शुक्रवार) निधन झाले आहे. कार्डिअॅक अरेस्ट (Cardiac Arrest) नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 20 दिवसांपासून रायपुर (Raipur) मधील श्री नारायण हॉस्पिटलमध्ये (Shree Narayana Hospital) त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. या दिवसांत त्यांना 3 वेळा Cardiac Arrests चा त्रास झाला. परंतु, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती फारच खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. त्यांचा मुलगा अमित जोगी (Amit Jogi) यांनी त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (छत्तीसगढ चे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात; डॉक्टरांची माहिती)

सरकारी नोकरी ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास होता. मध्यप्रदेश मधून छत्तीसगढ विलग करण्यात आल्यानंतर नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर 2003 पर्यंत त्यांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 2016 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि 'जनता काँग्रेस छत्तीसगढ़' या स्वपक्षाची स्थापना केली.

ANI Tweet:

अजीत जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांनी त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "छत्तीसगढ राज्यावरुन आज माझ्या वडीलांचा हात उठला आहे. फक्त मी नव्हे तर पूर्ण छत्तीसगढ राज्याने आपले पिता गमावले आहेत. माननीय अजीत जोगी हे आपल्या करोडो लोकांच्या कुटुंबाला सोडून देवाघरी गेले आहेत. गाव आणि गरिबांचे आधारवड, छत्तीसगढचे लाडके आपल्यापासून खूप लांब गेले आहेत."