दिल्लीनंतर आता गाझियाबादमध्ये पुराचा कहर दिसत आहे. हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये हिंडन नदीचे पाणी शिरल्याने ग्रेटर नोएडातील एका मोकळ्या मैदानात 350 गाड्या पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. हिंडन नदीला आलेल्या पुरामुळे ग्रेटर नोएडातील सुतियाना गावाजवळ डम्पिंग यार्डमध्ये उभ्या असलेल्या 350 गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. Video: यमुना नदीत इंडियन ऑइलची गॅस पाइपलाइन फुटली. (वाचा हेही - Maharashtra Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट)
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Noida, Uttar Pradesh | The area near Ecotech 3 remains submerged due to an increase in the water level of Hindon River.
Latest drone visuals from the area. pic.twitter.com/7GHCz1m3fE
— ANI (@ANI) July 26, 2023
एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ ग्रेटर नोएडाच्या इकोटेक-3 जवळचा आहे. मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या पांढऱ्या कारच्या रांगा पाण्यात बुडलेल्या दिसतात. पुराचे पाणी गाड्यांच्या छतापासून काही इंच अंतरावर आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूला फक्त पाणी दिसत आहे.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, इकोटेक-3 पोलिस स्टेशन हद्दीतील पुराणा सुतियाना गावात हिंडन नदीच्या बुडित भागात ओला कंपनीच्या कारचा डम्पयार्ड असून तेथे सुमारे 350 वाहने आहेत. त्यांनी सांगितले की, या यार्डचे केअरटेकर दिनेश यादव यांनी पोलिसांना सांगितले आहे की, कोरोना काळातील जुन्या आणि जप्त केलेल्या गाड्या येथे पार्क केल्या आहेत आणि ती सर्व वाहने सध्या बंद पडून आहेत.
लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे
पोलीस स्टेशन इकोटेक III अंतर्गत हिंडन नदीच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हा दंडाधिकारी मनीष कुमार वर्मा म्हणाले, पूरग्रस्त जास्तीत जास्त कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आम्ही इतर कुटुंबांना निवारा गृहात जाण्याची विनंती करत आहोत...सुमारे 2000 क्युसेक पाणी कमी झाले आहे, परंतु त्यात कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही.