तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, घटनेचा Video Viral; आरोपी, पीडिता एका कॉलेजचे विद्यार्थी
Gangrape. (Image used for representational purpose)

कर्नाटक (Karnataka) राज्यातील दक्षिणी कन्नड जिल्ह्यातील एका खासगी कॉलेजमध्ये पाच विद्यार्थ्यांनी आपल्याच कॉलेजमधील एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पीडितेवरील अन्यायाला वाचा फुटली. पोलीसांनी माहिती देताना म्हटले आहे की, सर्वा आरोपी हे 19 वर्षांचे आहेत. सर्व आरोपींवर भारतीय संड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडितेला आपल्या कारमध्ये बसवले आणि जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओही बनवला. तसेच, घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

दरम्यान, संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हा पोलिसांनी पुटुर महिला पोलिस स्टेशनध्ये या घटनेबाबत गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपींच्या शोधार्थ दोन पथकं रवाना केली. या पथकांकरवीच आरोपींना अटक करण्यात आली. (हेही वाचा, कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)

दरम्यान, जिल्हा पोलीस अधिकक्षक बी एम लक्ष्मी प्रसाद यांनी या घटनेचा व्हिडिओ लोकांनी व्हायरल करुन नये. हा व्हिडिओ व्हायरल करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.