Air India New Logo | (PC - ANI/X)

First Look of Air India New Logo & Design: टाटा ग्रूप संचलीत एअर इंडिया कंपनीने आपले डिजाईन आणि लोगममध्ये बदल केला आहे. हा बदल केल्यानंतर कंपनीच्या विमनाची पहिली झलक प्रवाशांसमोर आली आहे. जी कंपनीने एक्स पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. आपणही A350 planes चा पहिला लूक येथे पाहू शकता. एअरलाइनने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन रेड-ऑबर्गिन-गोल्ड लुक आणि नवीन लोगो 'द व्हिस्टा'सह स्वतःचे रीब्रँड केले होते.

एअर इंडिया एअरलाइन्सने माहिती देताना सांगितले आहे की, नवीनतम A350 इमेज फ्रान्सच्या टूलूस येथील कार्यशाळेत क्लिक करण्यात आल्या. यंदाच्या हिवाळ्यापर्यंत एअर इंडियाची नवी विमाने भारतात दाखल होतील आणि लवकरच प्रवाशांच्या सेवेत हजर होतील. एक्स पोस्टच्या ( पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, टूलूजमधील पेंट शॉपमध्ये आमच्या नवीन लिव्हरीमध्ये भव्य A350 चा पहिली झलक आम्ही सादर करतो आहोत. आमचे A350 येत्या हिवाळ्यात भारतात दाखल होत आहेत.

दरम्यान, कंनीद्वारा आपल्या ताफ्यात नवी विमाने घेण्यासाठी तब्बल 400 दशलक्ष डॉलर खर्च केले जात आहेत. एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते की त्यांचा नवीन लोगो, द व्हिस्टा, सोनेरी खिडकीच्या चौकटीच्या शिखरावरून प्रेरित आहे. एअरलाईन वारशातून स्वतःला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करते आहे. दरम्यान, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी यापूर्वी म्हटले होते की, एअर इंडिया जगभरातील पाहुण्यांना सेवा देणारी जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्याची आमची नवीन ब्रँड महत्त्वाकांक्षा बाळगते. तसेच, ती जागतिक स्तरावर एका नवीन भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व करते. सन 2025 पर्यंत एअर इंडियाच्या सर्व विमानांमध्ये नवीन लोगो असेल, असेही ते म्हणाले होते.

ट्विट

एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगसोबत अब्जावधी डॉलर्सच्या विमान करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही महिन्यांनी ऑगस्टमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. नवीन लोगो लाँच करताना, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, नवीन लोगो "अमर्याद शक्यता दर्शवितो". दरम्यान, Tata Sons ने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाला त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, Talace Private Limited मार्फत विकत घेतले. त्यानंतर, टाटा सन्सची आणखी एक उपकंपनी, एअर इंडिया आणि विस्तारा यांचे आणखी एकसंध अस्तित्व निर्माण करण्यासाठी विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे विलीनीकरण मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.