Fire At Kamla Raja Hospital In Gwalior | ANI

Fire At Kamla Raja Hospital In Gwalior: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर (Gwalior) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ग्वाल्हेरमधील कमला राजा रुग्णालयात (Kamla Raja Hospital) एसी ब्लास्ट (AC Blast) मुळे आग (Fire) लागली. आगीमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

ग्वाल्हेर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी अतिबल सिंह यादव यांनी सांगितले की, 'मला लेबर रूममध्ये आग लागल्याची माहिती मिळाली, मी 6 अग्निशमन केंद्रांना कळवले, जवळच्या अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. एसी ब्लास्टमुळे ही आग लागली. घटनेदरम्यान, कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका तिथे उपस्थित होते. त्यांनी खिडक्या तोडून रुग्णांना तेथून बाहेर काढले, अन्यथा ही मोठी घटना घडू शकली असती.' (हेही वाचा -Goregaon Fire: गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी रोडवरील रत्नागिरी हॉटेल आणि वाघेश्वरी मंदिराजवळील दुकानाला भीषण आग; पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ - 

दमरम्यान, ग्वाल्हेरचे एसडीएम विनोद सिंह यांनी सांगितले की, 'वातानुकूलित स्त्रीरोग विभागात आग लागली, तिथे सुमारे 22 लोक होते. लोकांना प्रथम बाहेर काढण्यात आले. आगीमुळे धूर खूप वेगाने पसरला. सर्व रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.