Mumbai Fire:  क्रॉफर्ड मार्केट मधील दुकानाला आग, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना (Video)
Level 2 Fire Broke At Crawford Market,Mumabai (Photo Credit: ANI)

MUMBAI: मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांपैकी मानल्या जाणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट( Crawford Market) मधील  दुकानाला  सोमवारी सकाळी आग लागल्याचे वृत्त हाती लागले आहे. जुम्मा मस्जिदच्या (Jumma Masjid) मागील अब्दुल रहमान मार्गावर (Abdul Rahaman Marg) असलेल्या सुपर शॉपिंग मार्केट (Super Shopping Market) मध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येतेय.  पोलीस (Police), अग्निशामक दल (Fire Brigade) व रुग्णवाहिकांची (Ambulance) वाहने  तातडीने संबंधित स्थळी दाखल झाली आहेत.

ANI ट्विट

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेल्या आगीचा  व्हिडिओ

सोमवारी सकाळीच  भिवंडी येथील  येथील काल्हेर (Kalher) परिसरातील एका इमारतीला आग लागल्यानंतर एकाच दिवसतील ही दुसरी घटना समोर आली आहे. Bhiwandi Fire: भिवंडी येथील काल्हेर परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.