Kumbh Mela 2019 : प्रयागराज येथे दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग
Fire at a camp of Digambar Akhada at KumbMela (Photo Credit : ANI)

Kumbh Mela 2019 : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथे उद्यापासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच प्रयागराज (Prayagraj) येथील संगम नगरमध्ये आग लागल्याची घटना समोर येत आहे. या परिसरातील दिगंबर आखाडा (Digamber Aakhada) आणि जवळपास असलेल्या तंबूंना (Tents) आग लागली आहे. आग जलद गतीने परसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून आगीमुळे गोंधळलेल्या, घाबरलेल्या नागरिकांना प्रशासनाने शांत राहण्याचे आवाहन केले आहे.