आजपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर फास्टॅग असणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासोबत प्रदूण कमी करणे आणि लांब लचक वाहन्यांचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट टोलची रक्कम भरावी लागणार आहे. या दरम्यान चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग कुठून मिळणार आणि किती पैसे खर्च करावे लागणार या संबंधित संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
काय आहे फास्टॅग?
फास्टॅग हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनचा भाग असून तो टोल नाक्यावर उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान आरएफआयडी वर काम करते. हा टॅग वाहानाच्या पुढील बाजूला असलेल्या काचेवर लावावा लागणार आहे. त्यामुळे ज्या वेळी तुम्ही टोल नाक्याच्या येथून जाणाार तेव्हा तुमच्या गाडीवर लावलेला फास्टॅग तेथे स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे अटोमॅटिक तुमच्याकडून टोलचे पैसे वसूल केले जाणार आहे. यासाठी वाहन जास्त वेळ टोल नाक्यावर थांबवावे लागणार नाही आहे. एकावेळेस घेतलेला फास्टॅग 5 वर्षांसाठी कायम राहणार आहे. मात्र हा फास्टॅग चालकांना वेळेनुसार रिचार्ज करावा लागणार आहे.(Fastag 'या' ठिकाणी दिला जात आहे फ्री)
कुठून खरेदी करु शकता फास्टॅग?
तुम्हाला जर फास्टॅग खरेदी करायचा असल्यास तो वाहन खरेदी केलेल्या डीलकर कडून तुम्ही खरेदी करु शकता. त्याचसोबत खासगी बँकने सुद्धा फास्टॅग उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये अॅक्सिस बँक, आयडीएफसी बँक, एसबीआयस आयसीआयसीआय बँक यांच्या कोणत्याही शाखेतून वाहनधारकांना फास्टॅग खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर फास्टॅग तुम्हाला पेटीएमच्या माध्यामातून सुद्धा विकत घेता येणार आहे.
फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. त्यामध्ये वाहनधारकांना आरसी बुक, चालकाचा फोटो, केवायसी कागदपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी सुद्धा दाखवू शकता. हे कागदपत्र सादर केल्यानंतर तुमचे वाहन खासगी की व्यावसायिक कामासाठी आहे हे कळणार आहे. तर फास्टॅग खरेदी केल्याचे फायदे सुद्धा चालकांना होणार आहेत. त्यामध्ये टोलनाक्यावर टोल भरण्याचा वेळ वाचणार, लांबलचक वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच फास्टॅग असलेल्या धारकांना कॅशबॅक आणि अन्य ऑफर्स सुद्धा दिल्या जाणार आहेत.