Farmers Protest: धक्कादायक! टिकरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी मुलीवर बलात्कार; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हरियाणा पोलिसांनी टिकरी बॉर्डर (Tikri Border) शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) भाग घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील मुलीवर बलात्कार (ईजा) झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या मुलीचा नुकताच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. चार मुलांनी आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. भादंवि कलम 365, 342, 354, 376 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये चार शेतकरी नेते आणि आंदोलनाशी संबंधित दोन महिला स्वयंसेवकांचा समावेश आहे.

पोलिसांनी सर्व आरोपींविरूद्ध सामूहिक बलात्कार तसेच अपहरण, ब्लॅकमेलिंग, बंधक बनविणे आणि धमकी यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुलीसोबत दुष्कृत्य घडल्याचे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 30 एप्रिल रोजी कोरोना संक्रमणामुळे या मुलीचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सुमारे चार दिवस आधी मुलीला शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून सीमेवर शेतकरी चळवळीसाठी सोशल आर्मी चालवणारे अनूप आणि अनिल मलिक यांच्यासह एकूण 4 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

ही मुलगी 11 एप्रिल रोजी आरोपीसह पश्चिम बंगालहून दिल्ली येथे आली होती. दिल्लीहून ती आरोपीसमवेत सीमेवर आली. मुलीवर बलात्कार केलेला आरोपी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी चळवळीत खूप सक्रिय होता. अनिल मलिक, अनुपसिंग, अंकुश सांगवान, जगदीश ब्रार, कविता आर्य आणि योगिता सुहाग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख सदस्यांनी यासंदर्भात टिकारी सीमेवर गुप्त बैठक घेतली आणि या संदर्भात मोर्चाच्या वतीने चौकशी समिती स्थापन करण्याचा विचार झाला. (हेही वाचा: देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे, राहुल गांधींनी फोटो ट्विट करुन केंद्र सरकारवर साधला निशाणा)

दरम्यान, चळवळीत सहभागी असलेल्या अनेक संघटनांकडून याप्रकरणाबाबत आवाज उठविला जात होता. या महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आधीपासूनच या चळवळीशी संबंधित अनेक विवाद झाले आहेत. आता अशा प्रकारच्या घटनेमुळे आंदोलनावर आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.