देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे, राहुल गांधींनी फोटो ट्विट करुन केंद्र सरकारवर साधला निशाणा

या ट्विटमध्ये एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला करोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे, राहुल गांधींनी फोटो ट्विट करुन केंद्र सरकारवर साधला निशाणा
Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला असून याचा दाह देशवासियांना सहन करावा लागत आहे. त्यातच ऑक्सिजनअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती पाहत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेसाठी सरकारकडे नीट नियोजन नसल्याचे सांगत राहुल गांधींनी टिकास्त्र सोडले आहे. आजही राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी  (PM Modi) सरकारवर निशाणा साधला. कोरोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. ‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत.

या ट्विटमध्ये एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला करोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. कोरोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे.हेदेखील वाचा- COVID-19 च्या राष्ट्रीय नीतीमध्ये बदल, आता आरोग्य केंद्रात भरती होण्यासाठी पॉजिटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक नाही, जाणून घ्या नवी नियमावली

दरम्यान शनिवारी राहुल गांधी यांनी "जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए" असं ट्वीट केलं होतं. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला होता."

विस्टा प्रकल्पासंदर्भात बोलायचे झाले तर, दिल्लीत संसदेसमोरील 13 एकर जमिनीवर उभा राहात आहे. सध्या या जमिनीवर पार्क, पार्किंग आहे. ते हटवून त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेची इमारत उभी केली जात आहे. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2021 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).