Begging In Railway Fact Check (Photo Credits: Pixabay, Edited)

Indian Railway: भारतीय रेल्वे अधिनियम 1998 मधील तरतूद बदलुन रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये भीक मागण्यार्‍यांंना दंड आकारला (Decriminalising Of Begging) जाणार नाही तसेच त्यांंना अधिकृत परवानगी घेउन भीक मागता येईल अशा आशयाचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होता मात्र आता यावर रेल्वे तर्फे स्पष्टीकरण देण्यात आले असुन या अफवा आहेत यासंंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही असे सांगितले आहे. त्यामुळे पुर्वनियमांंनुसार कलम 144 न्वये , जर एखादी व्यक्ती ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आढळली तर त्यांना एक वर्षाची जेल किंवा 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

या व्यतिरिक्त रेल्वे अधिनियम कलम 167 मध्ये बदल करण्याचा विचारही रेल्वे तर्फे केला जात आहे. ज्यानुसार रेल्वेच्या डब्यात धूम्रपान करत असताना इतर प्रवाशाने तक्रार केल्यास पुढे खटला करण्याऐवजी तिथेच 100 रुपयांंचा दंड आकारला जावा असे सांंगितल्याची माहिती सुद्धा ऑनलाईन व्हायरल होत आहे. यामुळे रेल्वेच्या गुन्ह्यांंसाठीचा न्यायालयावर येणारा तणाव कमी होईल अशी अपेक्षा आहे असे नमुद करण्यात आले आहे. मात्र याबाबत तरी अद्याप रेल्वेने भाष्य केलेले नाही.

ANI ट्विट

दरम्यान, यापुर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने भीक मागणे हा दंडनीय गुन्हा ठरविणार्‍या कायद्यातील तरतुदींचे खंडन करत भीक मागणे गुन्हेगारीकरण करणे या समस्येच्या मूळ कारणांना सामोरे जाण्यासाठी चुकीचा दृष्टिकोन आहे असे मत व्यक्त केले होते. तर भीक मागणार्‍या टोळक्यांंमुळे अपहरणासारखे गंभीर गुन्हे सुद्धा वाढत आहेत असे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते.