Fact Check: 2 हजाराची नोट बंद होणार? आरबीआयने दिले 'असे' स्पष्टीकरण
RS 2000 Note (Photo Credit: PTI)

मागील काही दिवसांपासून  दोन हजाराची नोट (2 Thousand Currency Ban) कायमची बंद होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) सध्या बाजारात असणाऱ्या सर्व दोन हजाराच्या नोटा पुन्हा घेत असून त्यासोबतच नवीन एक हजाराच्या नोटा बाजारात येणार असल्याचे देखील सांगण्यात होते. मात्र या सर्व चर्चांवर आरबीआयतर्फे नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले. या सर्व बातम्या या अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवून गोंधळून जाऊ नये असे आरबीआयने आवाहन केले आहे.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार दिवाळीपूर्वीच मिळणार बंपर बोनस

काय होतं नेमकं प्रकरण?

मध्यंतरी सोशल मीडियावर काही ट्विट्स वारंवार दोन हजाराच्या नोटेच्या बंदीवर भाष्य करत होते. काही जणांकडून दोन हजाराची नोट ही आकाराने मोठी असल्याने एटीएम मधून सहज बाहेर येत नसल्याची तक्रार येत होती, परिणामी आरबीआय व सर्व सहकारी बकनाच्या एटीएम मधून २००० ची नोट हटवून त्याजागी 100,200,500 च्या नोटा समाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. इतकेच नव्हे तर आरबीआयतर्फे येत्या काळात पैशाच्या व्यवहारावर निर्बंध लावून आपण दहा दिवसात केवळ 50 हजार इतकीच रक्कम ट्रान्स्फर करू शकता असे मॅसेज सुद्धा व्हायरल होत होते.

पहा ट्विट

दरम्यान, आरबीआयने याबाबत स्पष्टपणे नकार दिला आहे. कोणतीही अधिकृत माहिती द्यायची झाल्यास ती थेट बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते त्याकरिता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजवर विश्वास ठेवण्याची गरज नाही असेही आरबीआयने सांगितले आहे.येत्या काळात दिवाळी असल्याने सोने खरेदीपासून ते अन्य अनेक गोष्टींकरिता प्रत्येकाकडेच खर्च असतात अशात नोटबंदी अथवा व्यवहारावरील निर्बंध लावल्याने पंचाईत होते की काय अशी नागरिकांना चिंता होती मात्र आता यावर स्पष्टीकरणानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.