Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Goa Election 2022 Exit Poll LIVE: गोव्यात कोणालाच बहुमत नाही

बातम्या अण्णासाहेब चवरे | Mar 07, 2022 08:27 PM IST
A+
A-
07 Mar, 20:27 (IST)

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोल्सनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता येणार नाही. गोव्यात भाजपला 14, काँग्रेस आणि मित्रांना 16, आपला 4 आणि इतरांना 6 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे टाईम्स नाऊचा एक्झिट पोल सांगतो.

07 Mar, 20:24 (IST)

गोव्यात भाजपला 18ते22 जागा मिळतील. गोव्यात भाजपचेच सरकार स्थापन होईल. आमच्या डबल इंजिन सरकारचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे. एक्झिट पोलनुसार, भाजप यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि पंजाबमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

07 Mar, 19:41 (IST)

आजतक एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने दर्शवलेल्या अंदाजानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरु शकेल. भाजपला 33% जागा मिळू शकतात. काँग्रेस पक्षाला 32% मतदान मिळू शकते. विधानसभेच्या 40 जागा असलेल्या या राज्यात भाजपला 14 ते 18 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 15 ते 20 जागा मिळतील अशी आशा असल्याचे हा एक्झिट पोल दर्शवतो.

07 Mar, 19:27 (IST)

झी न्यूज एक्झिट पोल दर्शवतो आहे की, गोव्यामध्ये भाजप 31, काँग्रेस 33, एमजीपी-12, आप-12 तर इतर पक्ष बारा जागा मिळवू शकतात.

07 Mar, 19:17 (IST)

एकूण जागा- 40

भाजपा: 16-22
कांग्रेस: 11-17
MGP+: 1-2
आम आदमी पार्टी: 0-2
अन्य- 4-5

07 Mar, 18:53 (IST)

विधानसभा निवडणुकीबाबत गोव्याच्या जनतेच्या मनात काय आहे याबाबत एक्झिट पोल्सचे अंदाज थोड्यात वेळात स्पष्ट करणार आहेत. 

महाराष्ट्राच्या शेजारी असलेले आणि तुलनेत छोटे असलेले राज्य म्हणजे गोवा (Goa). याच गोवा राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Goa Election 2022) मतदान पार पडले. या मतदानाची मतमोजणी येत्या 10 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, गोव्यातील जनमत कोणाच्या बाजूने याबाबत विविध एक्झिट पोल्स आपापले अंदाज दर्शवत आहेत. विविध एक्झिट पोल्सचे (Goa Election 2022 Exit Poll Prediction) निकाल आणि अंदाज आम्ही येथे देत आहो. गोव्यामध्य सत्ताधारी भाजपविरुद्ध इतर सर्व पक्ष असा सामना या वेळी पाहायला मिळाला. प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना, नवखा तृणमूल काँग्रेस आणि गोव्यातील स्थानिक पक्ष भाजप विरोधात आघाडीवर होते. त्यामुळे चुरस वाढली आहे.

एकूण 40 जागांसाठी गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली. गोव्यात सत्ता मिळविण्यासाठी बहुमताचा आकडा आहे 21. जो पक्ष 21 किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने निवडून येतो किंवा आघाडी करुन संख्याबळ मिळवतो तो गोव्याची सत्ता हातात घेतो. त्यामुळे सत्ताधारी भाजप, काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी 21 हा जादूई आकडा गाठण्याचा दावा केला आहे. या दाव्यांमध्ये आणि एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्याअंदाजात किती तथ्य हे येत्या 10 मार्च रोजीच कळणार आहे.


Show Full Article Share Now