EPFO पेन्शन संबंधित नियमात पुढील 24 तासात बदल होणार, नोकरदार वर्गांना होणार मोठा फायदा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निधी संगठन (EPFO) संबंधित पुढील 24 तासात नियमात बदल होण्याची शक्यता आहे. CNBC आवाज यांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इपीएफओ पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे. अॅडवान्समध्ये पेन्शनची रक्कम घेणाऱ्या धारकांना सुद्धा संपूर्ण रक्कम मिळू शकते. सोप्या शब्दात बोलायचे झाल्यासस PF सोबत कट होणारी पेन्शन आता अॅडवान्स मध्ये मिळणार आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त सरकारी नोकरदार वर्गासाठी होती. मात्र आता खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू होणार आहे. या निर्णयामुळे 6.5 लाख लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सॅलरीमधून प्रत्येक महिन्याला पीएफचे पैसे कापले जातात. हे पैसे इपीएफओ मध्ये जमा होता. पीएफमध्ये तुमच्या सॅलरीमधून कमीत कमी 12 टक्के कापले जातात. 12 टक्के कंपनीकडून दिले जातात. कंपनी जे योगदान देते त्याच्या 8.33 टक्के पेन्शन योजनेत पैसे जमा होतात. तर उर्वरित 3.67 टक्के इपीएफ मध्ये भरले जातात.(Sarkari Naukri: 7th Pay Commission अंतर्गत EPFO मध्ये मोठ्या पदांवर अधिकारी भरती, upsconline.nic.in वर 31 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज)

तसेच एखादा व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यास त्याला त्याच्या पेन्शनमधील 40 टक्के रक्कम अॅडवान्समध्ये काढता येणार आहे. पेन्शनधारक पुढील 10 वर्षासाठी अॅडवान्स पेन्शन घेऊ शकतात. म्हणजेच मासिक पेन्शनचा 40 टक्के 10 वर्षासाठी अॅडवान्समध्ये घेता येणार आहेत. पीएफ खात्यामधील रक्कम कर्मचारी एका मर्यादित कालावधीनंतर काढू शकतो. परंतु पेन्शनची रक्कम काढण्यासाठीचे नियम अधिक कठोर आहेत.