Indian Railway | प्रतिकात्मक प्रतिमा Photo Credits: commons.wikimedia

Engine of Garib Rath Express Separated From Coaches: जिल्ह्यातील जयनगर ते आनंद विहारकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेस (Garib Rath Express) गाडीचा मोठा अपघात टळला आहे. प्राप्त माहितीनुसार, गरीब रथ एक्स्प्रेस जयनगर ते आनंद विहारसाठी नियोजित वेळेवर निघाली. यानंतर थोड्याच वेळात ट्रेन 12:16 वाजता खजौली रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर किऑस्क क्रमांक 26 जवळ रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे पाहिल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर चालकाला हा प्रकार कळला.

लोको पायलटने इंजिन पाहिले तोपर्यंत ते एक किलोमीटर अंतरावर पोहोचले होते आणि बोगी इंजिनशिवाय रुळावर धावत होती. मात्र, चालकाने ब्रेक लावून इंजिन बंद केले. त्यानंतर इंजिन परत आणून बोगी जोडण्यात आली आणि त्यानंतर ट्रेन आनंद बिहारकडे रवाना झाली. दुपारी दीड वाजता ट्रेन मधुबनी रेल्वे स्थानकावर पोहोचली. गरीब रथमुळे जयनगरहून सुटणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांना उशीर झाला. (हेही वाचा -Delhi Metro's Blue Line Services Disrupted: केबल चोरीला गेल्याने मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यान दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन सेवा विस्कळीत)

बेगमपुरा एक्स्प्रेसमध्ये ट्रेनमधील सीटवरून वाद -

दुसऱ्या एका दु:खद घटनेत, गुरूवारी, एका 24 वर्षीय तरुणाचा बेगमपुरा एक्स्प्रेसमध्ये ट्रेनमधील सीटच्या वादावरून मृत्यू झाला. या घटनेत त्याचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर शारीरिक हाणामारीत झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले, वाद अधिक तीव्र झाला आणि तरुणांनी तौहीदवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले.

रेल्वे अपघातात घट - अश्विनी वैष्णव यांची माहिती

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षात 26 नोव्हेंबरपर्यंत उपकरणे निकामी होणे आणि तोडफोड यासह इतर कारणांमुळे एकूण 29 रेल्वे अपघात झाले. यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण जखमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या विविध सुरक्षा उपायांचा परिणाम म्हणून, अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परिणामी रेल्वे अपघात 2014-15 मधील 135 वरून 2023-24 मध्ये 40 पर्यंत कमी झाले आहेत.