Delhi Metro's Blue Line Services Disrupted: मोती नगर आणि कीर्ती नगर स्थानकांदरम्यान केबल चोरीला गेल्याने बुधवारी दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाइनवरील सेवा (Delhi Metro Blue Line Service) विस्कळीत झाली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशनचे तास रात्री संपल्यानंतरच समस्येचे निराकरण केले जाईल. बाधित विभागावरील गाड्या दिवसभर मर्यादित वेगाने धावतील, ज्यामुळे उशीर होईल. दरम्यान, DMRC ने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यान दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन सेवा विस्कळीत -
🔴#BREAKING | Cable theft reported in Delhi metro route between Moti Nagar and Kirti Nagar; Blue line metro services delayed @anushkagarg2000 reports pic.twitter.com/RKqg2ln3r5
— NDTV (@ndtv) December 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)